सत्तरच्या दशकातील बालपणातील काही गोष्टी -पहिला कलर फोटो
पहिला कलर फोटो साधारण १९८३ मध्ये मी मामा कडे आजोळी प्राथमिक शिक्षण घेत होतो . आजोबांचे भाडेकरू श्री सुतार हे शिर्के कंपनीत कामाला होते .कंपनीने त्यांना दुबई येथे कामासाठी पाठविले होते.दुबई वरुन येताना खूप नाविन्यपूर्ण गोष्टी आनल्या होत्या.त्यांनी कलर कँमेरा तसेच थ्रीडी चित्र आणली होती.त्यांनी मामा मामी सोबत पहिला कलर फोटो काढला होता. हात आत ओढलेल्या.सावधान स्थितीतील फोटो पाहून हसावयास येते. आजही तो प्रसंग व फोटो जपून ठेवला आहे.