Posts

Showing posts from June, 2021

सत्तरच्या दशकातील बालपणातील काही गोष्टी -पहिला कलर फोटो

  पहिला कलर फोटो साधारण १९८३ मध्ये मी मामा कडे आजोळी प्राथमिक शिक्षण घेत होतो . आजोबांचे भाडेकरू श्री सुतार हे शिर्के कंपनीत कामाला होते .कंपनीने त्यांना दुबई येथे कामासाठी पाठविले होते.दुबई वरुन येताना खूप नाविन्यपूर्ण गोष्टी आनल्या होत्या.त्यांनी कलर कँमेरा तसेच थ्रीडी चित्र आणली होती.त्यांनी मामा मामी सोबत पहिला कलर फोटो काढला होता. हात आत ओढलेल्या.सावधान स्थितीतील फोटो पाहून हसावयास येते.  आजही तो प्रसंग व फोटो जपून ठेवला आहे.

कदर (कहानी)

  कदर      संजय चे लग्न  2 महिने झाले होते. संजय लग्नाच्या नवलाईत अडकलेला होता .त्याचा मोठा बंधू विराज किर्लोस्कर कंपनीत कामाला होता. विराज व संजय चे वडील रेल्वेत  लिपिक म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.त्यांच्या पत्नी माला  या सुद्धा प्राथमिक शिक्षिका होत्या, त्या सावित्रीबाई फुले  शिक्षण संस्थेत प्राथमिक ला शिकवत असत.यावर्षी त्या  निवृत्त झाल्या आहेत.       माला मॅडम रेल्वे कॉलनीतुन हडपसरला बसणे जात असत परंतु त्यासाठी त्यांना रेल्वे कॉलनी ते त बस स्टॅन्ड पर्यंत चालत जावे लागे तसेच हडपसर ते ससाणे नगर ला चालत जावे लागे व संध्याकाळी परत अशा प्रकारे प्रवास करून दिवसभर मुलांना शिकवावे लागत असे.संध्याकाळी कधी आठ वाजायचे कधी नऊ वाजायचे.त्या नंतर स्वयंपाक करायचा.       दोघांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले आपल्या हौशी- निवडीला बाजूला ठेवून त्यांनी मुलांसाठी आपले आपले जीवन वेचले.    "पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तिही लोकी झ...