कदर (कहानी)
कदर
संजय चे लग्न 2 महिने झाले होते. संजय लग्नाच्या नवलाईत अडकलेला होता .त्याचा मोठा बंधू विराज किर्लोस्कर कंपनीत कामाला होता. विराज व संजय चे वडील रेल्वेत लिपिक म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.त्यांच्या पत्नी माला या सुद्धा प्राथमिक शिक्षिका होत्या, त्या सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेत प्राथमिक ला शिकवत असत.यावर्षी त्या निवृत्त झाल्या आहेत.
माला मॅडम रेल्वे कॉलनीतुन हडपसरला बसणे जात असत परंतु त्यासाठी त्यांना रेल्वे कॉलनी ते त बस स्टॅन्ड पर्यंत चालत जावे लागे तसेच हडपसर ते ससाणे नगर ला चालत जावे लागे व संध्याकाळी परत अशा प्रकारे प्रवास करून दिवसभर मुलांना शिकवावे लागत असे.संध्याकाळी कधी आठ वाजायचे कधी नऊ वाजायचे.त्या नंतर स्वयंपाक करायचा.
दोघांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले आपल्या हौशी- निवडीला बाजूला ठेवून त्यांनी मुलांसाठी आपले आपले जीवन वेचले.
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तिही लोकी झेंडा!
प्रत्येकाच्या आई- बापाला वाटत असते की आपल्या पोरांनी शिकून मोठं व्हावं,त्यांनी आई- बापाचे नाव कमवाव!आपलं जीवन हालाकित गेलं पण लेकारांना सुखाचे दिवस यावेत अशी प्रत्येक बापाची इच्छा असतें.
हाडाची काडं करून बाप पोराला मोठ्या दिमाखात कॉलेजला पाठवतो.पोरगा कालेजात आल्यावर त्याला अनेक मित्र भेटतात.मित्रंच त्यांचे विश्व बनतात तसंच ते बिघडतात किंवा घडतात देखील.
शिकायच्या वयात शिकायचं सोडून आजकाल ची पोरं बापानं घेऊन दिलेल्या मोबाईलवर राजकीय चर्चासत्र रंगवतो. राजकीय नेत्यांचे स्टेटस आपल्या मोबाईल मध्ये ठेवतो.
कसंबसं पदवीचं पुंडक त्याच्या हातात येतं, अन ही पोरं रुबाब मारायला सुरुवात करतात.
लिनन चा पांढरा शर्ट,स्किनफिट जीन्स अन डोळ्यावर काळा गॉगल घालून ही पोरं बापानं घेऊन दिलेल्या गाडीवर आपल्या नेत्याचा फोटो लावून बोंबलत शहरात चक्कर मारायला तयार असतात.
त्यातच वाढदिवस असल्यावर त्यांचे मित्र सोशल मीडियावर आमचं काळीज,दोस्तीच्या दुनियेतला राजा,एक उगवतं नेतृत्व, भावी सरपंच अश्या पोस्ट टाकून चार पाच ठिकाणी उघड्या गाडीवर केक कापून खाण्या ऐवजी तोंडाला फासून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात.
कमवायच्या वयात ही पोरं नको त्या लोकांच्या नादी लागून आपलं जीवन बरबाद करतात.बापाच्या गाठीचा पैसा उधळतात. बापाचा पायातील जोडा चार जागेवर फाटलेला तसाच ओढीत बाप चालत असतो अन याच्या पायात मात्र करकर वाजणारी कोल्हापुरी असते.
दोघेही हे कशातही न पडतात सतत अभ्यास करून दोघांनी उच्च शिक्षण घेतले
रुपाली दिसायला सुंदर होती. रुपाली चे लग्न ठरण्यात कोणतीची अडचण यायला नको होती, पण का कोण जाणे तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला कुणी मुलगा पसंतच पड़त नव्हता. देखण्या रुपालीचं लग्नाचं वय बघता बघता निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपॉल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच नव्हता.
शेवटी रुपालीनं विराजशी सूतं जमवलं. विराजचे अन् तिच प्रेमप्रकरण तीन चार वर्ष सुरू होतं. रुपालीचे वडील एव्हाना अंथरूणाला खिळले होते. त्यांनी रुपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली.
रुपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन् त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विराजचं रुपालीवर मनापासून प्रेम होतं, माला मॅडम ने अत्यंत सन्मानानं रुपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं रुपालीचे घरचे वातावरण कट्टर गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता आर्थिक बाज भक्कम होती पण सासूचा कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ.
माला मॅडम अन् प्रभाकर हे जोडपं. अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे कुटुंबात सुनेन साडी नेसावी, डोक्यावरून पदर व्यावा. तोकडे, लांडे कपडे घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत. अशी माला मॅडमची अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.
विराज रूपालीला शांतपणे समजवायचा" थोड धीरानं घे. सगळ चांगलं होईल "म्हणून सांगायचा पण हट्टी अन् मानभावी रुपालीला ते.मान्य तव्हतं एक दिवस चिड़ून, भांडण करत ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजूत घालून परत पाठवण्याऐवजी उलट तिला. आणि विराज ला अधिक भडकण्यातच धन्यता मानली.रुपालीची बहीण तेजश्री तर स्वतःच्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली होती. आता रुपालीच्या बाबतीतदेखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू केले. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती रुपालीला सांगायची. मूर्ख रुपालीनं आई व बहिणीच्या नादाने माहेरी राहिली होती. तिच्या आईलाही विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.मात्र घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं नव्हतं.माहेरी रुपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली. काम करत असायची. आई अन् दीपाली सकाळ सध्याकाळ भटकायला जायच्या. घरात अन् बाहेर मनसोक्त हादडायच्या.
परंतु रूपालीला याचा कंटाळा येऊ लागला तिला विराज ची नेहमी आठवण येऊ लागली.सासरचे वेध लागले होते.
दिवाळी निमित्त करून माहेर सोडून सासर गाठले . काही दिवस सुखाने राहिल्याने नंतर परत मूळ स्वभाव जागा होऊ लागला.विराजशी भांडू लागली. मुलगा आणि सुनेची कटकट ऐकुण माला मॅडम चे मन खिन्न झाले.
" कशाला भरलेल्या घरात वाद करता रे तुम्ही " सासुचे बोल एकुण सुन तोंड वाकडं करीत म्हणाली " सासुबाई तुम्ही गप्प रहा. आमच्यात लुडबुड करू नका " सुनेचे बोलणे ऐकून माला मॅडम ला खूप अपमानास्पद वाटले.माला मॅडम ने संजय चे लग्न ठरवलं. संजय चे लग्न व्यवस्थित पार पडले.
आईचा झालेल्या अपमानामुळे वैतागलेल्या संजय ने मनाशी गाठ. .. .!!
रात्री साडेअकरा वाजता एक वयस्क माला मॅडम स्वयंपाकघरात भांडी घासत असताना तिच्या घरात दोन सुना भांड्याच्या आवाजाने त्रस्त झाल्या होत्या आणि त्या आपल्या नवऱ्याला आईला जाऊन बोलायला सांगतात.
नवी सुन नवऱ्याला बोलते तुझ्या आईला रात्री भांडे घासायला मना कर, सकाळी पण ५ वाजता उठून पूजा करून आवाज करत असते त्याच्या मुळे झोप मोडते आणि त्रास होतो तुम्ही जाऊन हे नको करू सांगा, संजय उठून किचनच्या दिशेने जातो.
वाटेत हीच गोष्ट त्याच्या मोठ्या भावाच्या खोलीतून ऐकू येत होती. त्याने मोठ्या भावाची विराज ची खोली ठोठावली. विराज बाहेर आला.दोघानी चर्चा केली. दोन्ही भाऊ स्वयंपाकघरात जातात आणि आईला भांडी साफ करण्यास मदत करतात,आई नकार देते पण ते ऐकत नाही आणि भांडी साफ झाल्यानंतर दोन्ही भाऊ आईला मोठ्या प्रेमाने तिच्या खोलीत घेऊन जातात, मग आवाज ऐकून त्यांचे वडील पण जागे होतात दोन्ही भाऊ आईच्या पलंगावर बसतात आणि म्हणतात, "आई आज आम्ही येथे चे झोपणार व सकाळी आम्हाला ही पूजा करायला उठव आणि आम्ही सकाळी वडिलां सोबत योगा पण करू, आई म्हणाली ठीक आहे दोघं सकाळी लवकर उठून पूजा करू लागले.दोघे शांत होते.दोघी सूना हे पाहून हबकून गेल्या. सर्व आवरून आपल्या बायकांशी न बोलता आफिस ला गेले.
संध्याकाळी आपल्या बेडरूममध्ये न जाता आई-वडिलांच्या रूममध्ये गेले. जे्वन झाल्यावर रात्री ९.३० वाजता भांडी त्यांनी साफ करण्यास सुरवात केली.
दोघांच्या पत्नी येऊन म्हणाल्या ,"आम्हाला माफ करा पुन्हा अशी चूक करणार नाही"
आमची पण आई आहे आम्ही मदत करतो . पुढील तीन दिवसांत घरात पूर्ण बदल झाला सुना लवकर भांडे घासून ठेवायला लागल्या कारण त्यांच्या पतीला भांडे घासावे लागत होते म्हणून सकाळी लवकर देव पूजेला देखील उठायला लागल्या
काही दिवसात संपूर्ण घराच्या वातावरणात पूर्ण बदल झाला. सुनांनी सासू सासर्यांना पूर्ण आदर करण्यास सुरवात केली.
Comments
Post a Comment